Edible Oil Price: खाद्यतेल आणखी स्वस्त होणार ? सरकारने उचललं महत्त्वाचं पाऊल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जून । महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना खाद्यतेलाच्या बाबतीत पुन्हा सुखद दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किमतीत आणखी कपात झाल्याची खुशखबर लवकरच गृहिणीनं मिळू शकते. अन्न सचिवांनी तेल उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली असून मिळालेल्या माहितीनुसार, तेल उत्पादकांनी दरात कपात करण्याचे मान्य केले आहे. केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमती घसरल्याच्या अनुषंगाने देशातील प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर ८ ते १२ रुपयांनी कपात करावी, असे निर्देश दिले.

दरम्यान, अन्न सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर अन्न मंत्रालयाने सांगितले की, “ज्या कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि ज्यांची MRP इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे, त्यांनाही त्यांच्या किमती कमी करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *