Odisha Train Accident : ओडिशामधील अपघातानंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, १८ एक्स्प्रेस रद्द, संपूर्ण यादी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जून । ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्सप्रेस आणि बंगळुरु-हावडा एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्यानंतर मालगाडीला धडकल्या. या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २३३ जणांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ कडून बचाव कार्य सुरु आहे. बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आणि तिचे डबे दुसऱ्या रुळावर गेले आणि शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. त्यामुळं कोरोमेंडल एक्स्प्रेसच्या डब्यांना मालगाडीनं धडक दिली. या घटनेत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. या मार्गावरुन धावणाऱ्या १८ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या अंशत रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द झालेल्या एक्स्प्रेसची यादी
-१२८३७ हावडा-पुरी एक्स्प्रेस (२ जून, २०२३)
-१२८६३ हावडा-सर एम विश्वेश्वैया टर्मिनल एक्स्प्रेस (२जून, २०२३)
-१२८३९ हावडा-चेन्नई मेल (२ जून, २०२३ )
-१२८९५ शालिमार-पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस (२ जून, २०२३ )
-२०८३१ शालिमार-संबलपुर एक्सप्रेस (२ जून, २०२३ )
-०२८३७ संतरागाछी-पुरी स्पेशल (२ जून, २०२३ )
-22201 सियालदह-पुरी दुरंतो एक्स्प्रेस (२ जून, २०२३ )
-१२०७४ भुवनेश्वर-हावड़ा जन शताब्दी एक्स्प्रेस (भुवनेश्वरहून २ जून, २०२३ )
-१२२७८ पुरी-हावड़ा शताब्दी एक्स्प्रेस (पुरीहून ०३ जून २०२३)
-१२२७७ हावडा-पुरी शताब्दी एक्स्प्रेस (हावड़ाहून ०३ जून २०२३)
-१२८२२ पुरी-शालीमार धौली एक्स्प्रेस (पुरीहून ०३ जून २०२३)
-१२८२१ शालीमार-पुरी धौली एक्स्प्रेस (शालिमार से ०३ जून २०२३)
-१२८९२ पुरी-बांग्रीपोसी एक्स्प्रेस(पुरीहून ०३ जून २०२३)
-१२८९१ बांग्रीपोसी-पुरी एक्स्प्रेस (बांग्रीपोसी हून ०३ जून २०२३)
-०२८२३ पुरी-संतरागाछी स्पेशल ट्रेन (पुरीहून ०३ जून २०२३)
-१२८४२ चेन्नई-शालीमार कोरोमंडल एक्स्प्रेस (चेन्नईहून ०३ जून २०२३)
-१२५०९ एसएमवीटी बंगळुरु-गुवाहाटी (बंगळुरुहून ०३ जून २०२३)

या ट्रेन टाटानगरहून चालवल्या जाणार

-२८०७ संतरागाछी-चेन्नई एक्स्प्रेस (२ जून २०२३)
-२२८७३ दीघा-विशाखापटनम एक्स्प्रेस (२ जून २०२३)
-१८४०९शालीमार-पुरी श्री जगन्नाथ एक्स्प्रेस (२ जून २०२३)
-२२८१७ हावड़ा-मैसूरू एक्स्प्रेस (२ जून २०२३)
-१२८०२ नवी दिल्ली-पुरी पुरुषोत्तम एक्स्प्रेस (१ जूनला निघालेली ट्रेन टाटा-केंदुझारगढ़ मार्गे जाणार)
-१८४७८ ऋषिकेश-पुरी कलिंग उत्कल एक्स्प्रेस (१ जूनला निघालेली ट्रेन टाटा-केंदुझारगढ़ मार्गे जाणार)
-१२८१५ पुरी-आनंद विहार नंदनकानन एक्स्प्रेस ( ३ जूनला जाखापुरा-जरोली मार्गे निघणार)
-०८४१५ जालेश्वर-पुरी स्पेशल (जालेश्वरहून तीन जूनला निघणारी ट्रेन जालेश्वर ऐवजी भद्रक पासून जाणार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *