Gold Silver Rate Today : आज इतके कमी झाले सोने-चांदीचे भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुन । सोने-चांदीत खरेदीसाठी सध्या चांगली संधी असल्याचे मत, तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सोन्याचे भाव घसरले आहेत. सोने स्वस्त होऊन 60000 प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. 3 जून रोजी तर 770 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण होऊन सोने 60,480 रुपयांवर येऊन ठेपले होते. 22 कॅरेट सोने तर 55,450 रुपयांवर आले. चांदी 71,462 रुपये किलोवर आली आहे. डॉलरच्या जबरदस्त खेळीमुळे भावावर परिणाम दिसून येत आहे. 2 जून रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. तर चांदीने पण दरवाढीचे खाते उघडले. किलोमागे चांदी 600 रुपयांनी वधारली. 31 मे रोजी आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीने भाव (Gold Silver Price) वाढ नोंदवली होती. आज 6 जून रोजी सकाळच्या सत्रात भाव जाणून घेऊयात..


सराफा बाजाराची खबरबात
सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला सोने 707 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने स्वस्त होऊन 59601 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचले होते. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने 151 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून 60308 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. सोमवारी सोने स्वस्त झाले. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. चांदीत 90 रुपयांची वाढ होऊन भाव 71462 रुपये प्रति किलो वर बंद झाले.

भावात अशी वाढ
goodreturns च्या आकडेवारीनुसार, 31 मे आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदी वधारली होती. तर 1 जून रोजी संध्याकाळच्या सत्रात चांदीत 150 रुपयांची घसरण झाली होती. 2 जून रोजी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांची वाढ झाली. आज 3 जून रोजी सकाळच्या सत्रात भावात 10 रुपयांची वाढ झाली. आता संध्याकाळपर्यंत दोन्ही धातूत काय बदल होतो, हे स्पष्ट होईल. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 56,160 रुपये तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 61,260 रुपये झाले. 5 जून रोजी 22 कॅरेटचा भाव 55,450 रुपयांवर तर 24 कॅरेटचा भाव 60,480 रुपयांवर आला. 6 जूनचा सकाळच्या सत्रातील भाव अपडेट झाला नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *