महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड -माणूस म्हणून जन्माला तर सर्वच येतात परंतु स्वत:च्या व्यक्तिमत्वातून आपली छाप सोडणारे खूप तुरळक उदाहरण आपणाला पहावयास मिळतात. त्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजेच चाणाक्ष, मेहनती, आभ्यासू व माणुसकी या व अशा अनेक बाबींचा संगम असणारे मा. डाॅ. रवी सरोदे सर.सरांबद्दल बोलायच झाल तर निदान मला तरी शब्द अपुरे पडतील. तसे सरांची आणि माझी ओळख 2016 पासूनची मी स्वारातीम विद्यापीठात MA (English) शिकत आसतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मी पहिल्यांदा सरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावल होत. पण आमच्या मनात एक भिती होती चार जिल्ह्याचा कारभार सांभाळणारा एवढा मोढा माणुस आमच्या ह्या कार्यक्रमात कसा काय येईल अस वाटत होत पण अगदी ठरल्या वेळे प्रमाणे सर अगदी घड्याळाच्या काट्या प्रमाने आमच्या कार्यक्रमात हजर झाले. सरांनी सर्वांना पाहून स्माईल दिली आणि आमचा आनंद द्विगुणीत झाला. एक वेगळीच चुणूक सरांच्या स्वभावात दिसून आली.
कालांतराने मी सरांच्या सहवासात आलो व मला अस निदर्शणास आल की एका कुटूंब प्रमुखाला 4-5 सदस्यांना सांभाळण अवघड असते आणि इथे तर सर चार जिल्ह्यांचा परिक्षा नियंत्रक पदाचा कारभार कसा सांभाळत आसतील….? तसे पहायला गेले तर एका जिल्ह्यात जवळपास शेकडो काँलेजेस आसतील त्यात एका काँलेजात जेमतेम 3/4 हजार विद्यार्थीसंख्या मग ऐकूण चार जिल्ह्यात जवळपास लाखोंच्या संख्येत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व त्या सर्वांवर कस काय नियंत्रण व व्यवस्थापण करीत असतील यातून त्यांची कार्यकुशलता दिसून येते.
सरांच्या माणुसकी विषयी बोलायच झाल तर मागच्या गोष्टी तर सोडाच सध्या सुरू असलेल्या लाँडाउनच्या काळात हातावर पोट आसलेल्या गरजू कुटूंबाला सरांनी धान्याची मदत करीत व बंद पडणा-या चुली चेतवण्याच काम करीत उपासमारीवर आळा घालण्याच काम नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. कोरोनामुळे लागलेल्या चौथ्या लाँकडाऊनच्या काळात माणुसकीचा हात म्हणून आम्ही करित आसलेल्या निर्वासित, निराधार लोकांच्या आन्नसेवेत देखील सरांचा आधार आम्हाला मिळाला. त्यांच्या ह्या कार्यातून सर्वांप्रती मैत्री भावना व माणुसकी दिसून येते.
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… व दीर्घायुष्य लाभो हिच तथागता चरणी प्रार्थना…
– प्रबुद्ध चित्ते (8928842577).