बृजभूषण सिंह यांच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस, नातेवाईक व नोकरांची चौकशी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुन । रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या घरी दिल्ली पोलीस पोहोचले आहेत. यावेळी दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांचे नोकर, सुरक्षा कर्मचारी आणि काही कुटुंबीयांची चौकशी केल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी काही जणांचे फोनही तपाले. दिल्ली पोलीस रविवारी सकाळीच बृजभूणषण यांच्या घरी पोहोचले होते. कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 137 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान, लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूने तक्रार मागे घेतल्यामुळे बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे त्यांचा पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाईपासून बचाव होऊ शकतो.

एकीकडे साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी पुन्हा नोकरीला जाण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण यांच्यावरील आरोप मागे घेतले. शनिवारी रात्रीच तीन आंदोलक कुस्तीपटू गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी सरकारकडून त्यांना कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते, त्यानंतरच कुस्तीपटूंनी संप मिटवून कामावर परतण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *