महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण, रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोकण दौऱ्यावर मदत घेऊन निघाणार आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उद्या कोकण दौऱ्यावर चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा असणार आहे. या आधी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कोकण, रायगड परिसरात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती.
कोकणसाठी मदत साहित्य रवाना.
भाजपा कोकणवासियांच्या पाठीशी!Relief Material reaches #Konkan #BJP4Konkan #NisargaCyclone #BJP4Seva pic.twitter.com/hvnkDYFWEj
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 10, 2020
दरम्यान, आज भाजपकडून निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागासाठी मुंबईतून मदत रवाना करण्यात आली आहे.