महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुन । पंढरपूरच्या आषाढी यात्रेला (pandharpur ashadhi wari) येणाऱ्या मानांच्या पालख्यांसह सर्व दिंड्यांना राज्य शासनाने 50 हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केली आहे. पाटील हे आज (शुक्रवार) पंढरपूरात माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)
वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले पंढरपूरच्या यात्रेला येणारा भाविक गरीब, कष्टकरी वर्गातील आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काहीजण विठूभक्त इच्छा असताना देखील वारीला (pandharpur wari 2023) येऊ शकत नाहीत. अशा दिंड्यांना सरकारने अनुदान द्यावे. आमची मागणी तात्काळ मान्य न केल्यास सर्व दिंडीकरी – फडकरी सोबत घेऊन वारी थांबवण्याचा गंभीर इशारा देखील वारकरी साहित्य परिषदेने राज्य शासनाला दिला आहे.
दरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी सातारा जिल्ह्यातील लाेणंद येथे प्रशासनासमवेत बैठक घेत पंढरपूर यात्रा काळात भाविकांना पालखी सोहळ्याच्या कालावधीत कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना केल्या.