फक्त 350 रुपयांमध्ये मिळते ब्रँडेड जीन्स, पण एकच अट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुन । प्रत्येक तरूणाईमध्ये फॅशनची क्रेझ असतेच. नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी रोज नवे ट्रेंड बाजारात येतात. प्रत्येकजण आपली लाईफस्टाईल सुंदर करण्यासाठी नवीन डिझाईनचे कपडे घेत असतो. फॅशनच्या बदलत्या ट्रेंडमध्ये जीन्स हा कायम टिकलेला आणि चालणारा ब्रँड आहे. मुंबईमध्ये स्वस्तात आणि ट्रेंडिंग जीन्स मिळणाऱ्या एका ठिकाणाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


कुठं आहे स्वस्त मार्केट?

मुंबईतील मस्जिद बंदरजवळ असलेल्या दो टाकी, डंकन रोड परिसरातील ताहीर मंजीलमध्ये गेल्या40 वर्षांपासून जीन्सचे होलसेल मार्केट आहे. या मार्केटमध्ये सध्याच्या तरुणाईला आवडतील अशा ट्रेण्ड मध्ये असलेल्या जिन्स अगदी स्वस्त दरात उपलब्ध होतात. चांगल्या क्वालिटीच्या ट्रेन्डी जीन्स तुम्हाला स्वस्तात खरेदी करायच्या असतील तर हे मुंबईतीलअगदी योग्य मार्केट आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला 350 रुपयांपासून हव्या त्या पॅटर्नची जीन्स खरेदी करता येते.

‘हे गेल्या 30-40 वर्षांपासून मार्केट आहे. या मार्केटमध्ये होलसेल आणि रिटेल या दोन्ही दरात ब्रँडेड जिन्स मिळतात. महिला आणि पुरुषांना हव्या त्या पॅटर्नची जिन्स खरेदी करता येते. 28 ते 44 नंबरपर्यंत साईज असलेली पुरुषांची जीन्स तुम्हाला इथं पाहात येते. 350 ते 850 या दरामध्ये या जीन्स उपलब्ध आहेत. तर होलसेल रेटमध्ये 300 ते 600 रुपयात या जीन्स मिळतात. पण, होलसेलसाठी 30 पेक्षा जास्त जीन्स घ्यावे लागतात, अशी माहिती येथील दुकानदार मोहम्मद शोएब खान यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *