महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुन । WTC Final R Ashwin Reaction: अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडुलकर पासून ते गावसकर, हरभजन अशा प्रत्येकानेच आश्विनला भारतीय प्लेइंग इलेव्हनमधूनबाहेर हे समजत नाही असे म्हणत रोहित, द्रविड व संघनिवडीतील सदस्यांना टार्गेट केले होते. रोहित शर्माच्या टीम इंडियाला अल्टीमेट टेस्टमध्ये पॅट कमिन्स आणि कंपनीने पराभूत केल्यावर हेच चुकीचे निर्णय संघाला भोवले असल्याचे सुद्धा म्हटले जात आहे. आता या सगळ्या गोंधळात अश्विनची पहिलीच प्रतिक्रिया महत्त्वाची ठरत आहे.
राहुल द्रविड प्रशिक्षित संघाने दुर्लक्ष केलेला अश्विन WTC फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर आपले सहकारी आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या समाप्तीनंतर ट्वीट करत त्याने, आधी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन व आपल्या संघाची पाठराखण केली आहे.
Congratulations Australia on winning this #WTCFinal and closing out this cycle of test cricket. It is disappointing to end up on the wrong side of things, nevertheless it was a great effort over the last 2 years or so to get here in the first place.
Amidst all the chaos and…
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) June 11, 2023
“#WTCFinal जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. शेवट पराभवाने होणे निराशाजनक आहे, तरीही येथे प्रथम स्थानावर येण्यासाठी गेल्या २ वर्षांमध्ये एक चांगला प्रयत्न आम्ही केला. सगळा गोंधळ आणि टीकांमध्ये, मला असे वाटते की यंदा खेळलेल्या माझ्या सर्व संघ सहकाऱ्यांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खडकाप्रमाणे टिकून राहिलेल्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे,” अश्विनने ट्विट केले.