Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ - Maharashtra 24

सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ ‘बिपरजॉय’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुन । अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ या अतितीव्र रूप धारण केलेल्या चक्रीवादळाने अनोखा विक्रम नोंदवला आहे. १९८२पासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या उच्च क्षमतेच्या चक्रीवादळांपैकी बिपरजॉय हे सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ ठरले आहे.अरबी समुद्रात बिपरजॉय या चक्रीवादळाची निर्मिती झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने या चक्रीवादळाने आगेकूच केली. तसेच या चक्रीवादळाची तीव्रताही झपाटय़ाने वाढून आता ते अतितीव्र चक्रीवादळ झाले आहे. सध्या अतितीव्र असलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊन त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होईल. १२५ ते १३५ किलोमीटर प्रति तास या वेगाने हे चक्रीवादळ गुजरात ते पाकिस्तान दरम्यानच्या किनारपट्टीवर १५ जूनला धडकण्याची शक्यता आहे. तसेच चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे अरबी समुद्र खवळल्याने मोठय़ा लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत. केंद्र सरकारच्या इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फर्मेशन सव्र्हिस (आयएनसीओआयएस) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार लाटांची उंची आठ मीटरपेक्षा अधिक नोंदवली गेली आहे.

अरबी समुद्रात ऑक्टोबर २०१९मध्ये निर्माण झालेले क्यार हे चक्रीवादळ नऊ दिवस आणि पंधरा तास टिकले होते. तर अरबी समुद्रातच ६ जूनला निर्माण झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळाला आतापर्यंत सात दिवस झाल्याची माहिती हवामान विभागाच्या रिजनल स्पेशलाइज्ड मेटिओरॉलॉजिकल सेंटरने (आरएसएमसी) दिली. आता बिपरजॉ. चक्रीवादळ १५ जूनला धडकणार असल्याने त्याचा एकूण कालावधी दहा दिवस होऊन ते सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ म्हणून नोंदले जाईल.

मोसमीपूर्व काळात दोन चक्रीवादळे दुसऱ्यांदाच
मोसमीपूर्व काळात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात उच्च क्षमतेचे चक्रीवादळ येण्याची १९८२पासूनची दुसरीच वेळ आहे. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात मोखा या चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. तर या पूर्वी २०१९मध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोसमीपूर्व काळात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची घटना घडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *