Video : EDच्या छाप्यानंतर तामिळनाडूच्या ऊर्जामंत्र्यांना अटक ; ईडीने अटक करताच ऊर्जा मंत्र्याने हंबरडाच फोडला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुन । देशभरात ठिकठिकाणी ईडीच्या कारवाया सुरू आहेत. राजकीय नेते, अधिकारी आणि इतरांवर ईडीकडून कारवाया केल्या जात आहेत. ईडीच्या कारवाईत अनेकांना अटकही केली जात आहे. त्यांच्यावर खटलेही दाखल केले जात आहेत. मात्र, अटक होताना आजपर्यंत कोणीच ढसाढसा रडलं नाही. ईडीच्या कारवाईला राजकारण्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वच सामोरे गेले. पण एका ऊर्जा मंत्र्याला ईडीने अटक करताच त्याची बोबडी वळली. आता आपलं काही खरं नाही, असं वाटल्याने या मंत्र्याने हातपायच टाकले. त्याने चक्क हंबरडाच फोडला. हा मंत्री ढसाढसा रडू लागला. इतक्यात त्याचे कार्यकर्ते आणि समर्थक जमा झाले. त्यानंतर त्याच्या छातीत कळा उठल्या. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागले. त्यांच्या सखोल चौकशीनंतर आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्याने व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक केली. अधिकारी जसेही सेंथिल यांना घेऊन जायला निघाले, त्याक्षणी सेंथिल यांनी हंबरडाच फोडला. सेंथिल यांनी गाडीतच ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ झाला. एव्हाना त्याचे समर्थकही घटनास्थळी दाखल झाले होते. रडत असतानाच सेंथिल यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे ते अधिकच विव्हळू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लहान मुलासारखं रडले
काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी ऊर्जा मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर आजही सेंथिल यांची चौकशी केली आणि ईडी त्यांना अधिक चौकशीसाठी घेऊन जाण्यास निघाली. त्यावेळी सेंथिल यांनी जोरजोरात रडायला सुरुवात केली. लहान मुलासारखं ते रडायला लागले. ऊर्जा मंत्री कारमध्येच झोपले. आणि ढसाढसा रडू लागले. त्याचवेळी त्यांची तब्येत बिघडली. छातीत कळा आल्या. त्यामुळे अधिकारी त्यांना तात्काळ चेन्नईच्या ओमांदुरार सरकारी रुग्णालयात घेऊन गेले.

हाय वोल्टेज ड्रामा
सेंथिल यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळताच त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलला गरडा घातला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हॉस्पिटलबाहेर फुल हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. ईडीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती. डीएमकेचे खासदार आणि वकील एनआर एलांगो यांनी सेंथिल बालाजी यांना आयसीयूत शिफ्ट केल्याचं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *