महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुन । उष्णतेचा पारा काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. नागपुरात काल 16 जून रोजी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 17 जून रोजी नागपुरातील वातावरण कोरडे असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तर 2 दिवस नागपूर शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक 17 जून आणि 18 जून रोजी नागपूर जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्ष्यात घेता दुपारच्या वेळी आवश्यकता नसल्यास घरा बाहेर जाणे टाळावे आणि उन्हापासून वाचण्यासाठी टोपी रुमाल, सन कोट,पुरेसे पाणी इत्यादींचा वापर करावा असे आवाहन प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्यामध्ये काल 16 जून रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 17 जून रोजी शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अति हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागपुरातील उष्णतेचा पारा काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. नागपुरात काल 16 जून रोजी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 17 जून रोजी नागपुरातील वातावरण कोरडे असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तर 2 दिवस नागपूर शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक 17 जून आणि 18 जून रोजी नागपूर जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्ष्यात घेता दुपारच्या वेळी आवश्यकता नसल्यास घरा बाहेर जाणे टाळावे आणि उन्हापासून वाचण्यासाठी टोपी रुमाल, सन कोट,पुरेसे पाणी इत्यादींचा वापर करावा असे आवाहन प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापुरात पडलेल्या पावसामुळे वातावरणात थंडावा पाहायला मिळतो आहे. मात्र हा पाऊस अगदी थोड्याच प्रमाणात पडल्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दरम्यान आज 17 जून रोजी दिवसभर सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापुरात काल 16 जून रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर आज 17 जून रोजी देखील सारखेच म्हणजे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
मुंबईत काल 16 जून रोजी कमाल 33 अंश सेल्सिअस तर किमान 28 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज 17 जून रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल 16 जून रोजी किमान 22 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते आणि कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस होते. आज 17 जून किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस एवढे असेल आणि कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
कल्याण डोंबिवलीत उन्ह आणि घामानं नागरिक हैराण आहेत. काल 16 जून रोजी कल्याण – डोंबिवलीत कमाल तापमान 34 होते तर किमान तापमान 28 होते. तर आज 17 जून रोजी कमाल तापमान 34 तर किमान तापमान 28 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.