महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । अवघ्या 10 आणि 15 रुपयांना मिळणाऱ्या टोमॅटोने आता चांगलाच भाव खाल्ला आहे. टोमॅटोची आवक घटली आणि मागणी मात्र वाढतच आहे. अगदी भाजी आणि डाळीत आवर्जून वापला जाणारा टोमॅटो आता खिशाला परवडेनासा होत आहे.
मे महिन्यात किरकोळ बाजारात पाच ते दहा रुपये किलो विक्री होणाऱ्या टोमॅटो सध्या पन्नास ते साठ रुपये किलोवर पोहोचले. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.टोमॅटो जवळपास सगळ्या भाज्या आणि डाळ करताना वापरला जातो, याशिवाय सॅलडमध्येही उपयोग होतो. वाढत्या दरांमुळे गृहिणींचं बजेट कोलमोडलं आहे.
उकड्यामुळेच टोमॅटोच्या झाडाला फुल गळती झाली असून टोमॅटो उत्पादन कमी होत असल्याने मार्केटमध्ये जो टोमॅटो येत आहे त्याला ४० ते ५० रुपये किलो भाव मिळत आहे. आधीच पाऊस उशिरा आणि त्यात अति उष्णतेमुळे टोमॅटोची फुलं गळून पडत असल्याने खर्च कसा निघायचा उत्पादन कमी आपल्याने शेतकरी थोडा चिंतेत आहे.