Ashadhi Ekadashi 2023 : पंढरपूर वारीसाठी 135 जादा बस; सर्व आगारांमधून या तारखेपासून सुटणार बस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी यंदा जळगाव विभागातून १३५ एसटी बस सोडल्या जाणार आहेत. यंदा २९ जूनला आषाढी‎ पंढरपूर यात्रा असून, यासाठी जिल्हाभरातून हजारो प्रवासी‎ पंढरपूरकडे जातात. वारकऱ्यांच्या सोयीसाठी जळगाव विभागातर्फे १३५‎ बस तीन‎ टप्प्यांत सोडण्यात येणार‎ आहेत. (Ashadhi Ekadashi 135 ST buses will be released from Jalgaon division for Pandharpur Yatra jalgaon news)

विशेष म्‍हणजे यंदा सवलतींमुळे‎ महिला, ज्येष्ठ नागरिकां‎ची संख्या २५ टक्के वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्‍यानुसार जादा बसचे नियोजन करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले.

२४ जूनपासून या जादा बस विभागातील अकरा आगारांमधून सोडल्‍या जातील. द्वादशीनंतर पंढरपूरहून याच जादा बस भाविकांना परतीच्‍या प्रवासासाठी उपलब्‍ध असतील.

अशा सुटतील बस
जळगाव विभागातून जादा बससाठी तीन टप्‍पे केले आहेत. यात पहिला टप्पा २४ ते २५ जून‎दरम्यान जिल्ह्यातून १०० बस‎ सोडण्यात येणार आहेत, तर २६ ते २७‎ जूनदरम्यान १२५ बस, तर २८ व २९‎ जूनला ४० बस पंढरपूरला‎ सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी ३०‎ जूनला द्वादशीला पंढरपूर आगारात‎ १३५ बस तैनात असणार आहेत.‎ एकाचवेळी ३० पेक्षा अधिक‎ प्रवासी असल्यास‎ पंढरपूरसाठी बस सोडली जाणार‎ आहे.

जालना, अहमदनगरलाही सोडणार बस
जळगाव विभागातून जादा बस सोडल्‍या जात आहेत. शिवाय प्रवाशांच्या‎ सोयीसाठी इतर आगारांना मदत‎ म्हणून यंदा जालन्यासाठी ५०,‎ अहमदनगरसाठी ७५ बस‎‎ पाठविण्यात येणार आहेत. या १२५‎ बस दोन विभागांना दिल्‍या जाणार असल्या, तरी‎ जिल्ह्यांतर्गत कोणत्याही‎ फेऱ्या कमी होणार नाहीत.

आगारानुसार बसचे नियोजन

आगार……………जादा बस

जळगाव…………..२७

यावल…………….१५

चाळीसगाव………..६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *