महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुन । Vitality Blast Viral Catch : क्रिकेटच्या मैदानात दररोज अनेक विक्रम घडतात, त्याशिवाय अनेक घडामोडीही घडत असतात. फलंदाज, गोलंदाज, फिल्डर अनेकदा आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित करतात. फलंदाजाने लगावलेल्या फटक्याचे कौतुक होते, गोलंदाजाने घेतलेल्या विकेटचेही कौतुक होते. पण फिल्डर्सच्या कौशल्याचे खूप कमी वेळा कौतुक होते. फिल्डर आपल्या फिल्डिंगने थक्क करुन सोडतात. अशाच एका फिल्डर्सचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. इंग्लंडमध्ये सध्या व्हिटेलिटी ब्लास्ट ही टी 20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील एका झेलची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल असल्याची प्रतिक्रिया क्रीडाप्रेमी देत आहेत. ब्रॅड कुर्री याने सिमारेषावर झेपावत जबरदस्त झेल घेतलाय. सोशल मीडियावर या झेलचा व्हिडीओ व्हायरल झालाय. ब्रॅड कुर्री याच्या सहाकारीही झेल पाहून अचंबित झाले. कुणाच्याही डोळ्यावर विश्वास बसला नाही. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
STOP WHAT YOU ARE DOING
BRAD CURRIE HAS JUST TAKEN THE BEST CATCH OF ALL TIME 🤯#Blast23 pic.twitter.com/9tQTYmWxWI
— Vitality Blast (@VitalityBlast) June 16, 2023
टायमल मिल्सच्या चेंडूवर घेतला भन्नाट झेल
दरम्यान, ससेक्स आणि हॅम्पशायर सामन्यात ब्रॅड कुर्री याने जबरदस्त झेल घेतला. इंग्लंडमधील विटेलिटी ब्लास्ट स्पर्धेत टायमल मिल्स याच्या चेंडूवर ब्रॅड कुर्री याने अविश्वसनीय झेल घेतला. ब्रॅड कुर्री सिमारेषावर फिल्डिंग करत होता… मिल्स याने टाकलेला चेंडू इंग्लंडचा 34 वर्षांचा फलंदाज बेनी हॉवेलने जोराने भिरकावला… हा चेंडू आता षटकार जाईल असे सर्वांनाच वाटले त्याचवेळी ब्रॅड कुर्री याने हवेत उंचावत झेल घेतला. हा झेल पाहून मैदानात उपस्थित असलेले सर्वजण चकीत झाले. फलंदाजालाही विश्वास बसला नाही. या जबराट झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.