महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुन । तुम्हाला पण सोने-चांदीत (Gold Silver Rate Today) गुंतवणूक करायची असेल तर सध्या सुवर्णकाळ आहे. सोन्याचे भाव घसरणीवर आहे तर चांदीने थोडी उसळी घेतली आहे. सराफा बाजारात फेरफटका मारताना एकदा भाव जाणून घ्या, तुम्हाला सध्या हा फायद्याचा सौदा असेल. सोमवारी सोने 355 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आणि 59227 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोने 648 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले होते. हा भाव 59582 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोमवारी सोने-चांदीत घसरण दिसून आली. सोमवारी चांदी 61 रुपयांनी स्वस्त होऊन 72359 रुपये प्रति किलोवर पोहचली. तर शुक्रवारी चांदी 1358 रुपयांनी महागली होती. एक किलो चांदीसाठी 72420 रुपये मोजावे लागले होते.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
सोमवारी 24 कॅरेट सोने 59227 रुपये, 23 कॅरेट 58990 रुपये, 22 कॅरेट सोने 54252 रुपये, 18 कॅरेट 44420 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34648 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.