“मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा”, अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुन । राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही पक्षकार्याचे वेध लागले आहेत. ‘‘मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या’’, अशी विनंती त्यांनी बुधवारी (२१ जून) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठांकडे केली. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर सुरुवातीला त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं. पत्रकारांनी पुन्हा पुन्हा विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, यावर मी काय बोलू? तो त्यांच्या पक्षाचा मेळावा आहे. ही त्यांची अंतर्गत बाब आहे. विरोधी पक्षनेतेपदी कोणाला नेमायचं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. यावर काँग्रेस काय म्हणतंय, शिवसेना काय म्हणतेय हे प्रश्न विचारून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *