बोपखेल आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्यावेत : आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुन । पिंपरी विधानसभेचा अविभाज्य भाग असलेला बोपखेल परिसर 2015 मध्ये रस्त्याच्या अभावी दूरवर झाला होता.CME दापोडी मधून जाणार रस्ता सुरक्षेच्या कारणावरून कायमस्वरूपी बंद करण्यात आला त्यावेळी बोपखेल वासीय एकजुटीने रस्त्यावर उतरले त्यांना त्यांचा हक्काचा रस्ता हवा होता मात्र देशाची सुरक्षितता व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्यांचा संघर्ष आजतागायत सुरू आहे. केंद्राच्या अखत्यारीत असलेला हा विषय लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र दरम्यानच्या काळात २०१५ मध्ये झालेल्या आंदोलनात जवळपास 200 पेक्षा जास्त बोपखेल वासीयांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना तुरुंगात डांबले गेले त्या सर्व कार्यकर्त्यांना व त्यांच्या घरच्यांना रस्ता आंदोलनाच्या झळया आज देखील सोसाव्या लागत आहेत.आज त्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व विरोधी पक्षनेते आदरणीय अजित दादा पवार यांना भेटून निवेदन देण्यात आले.मुख्यमंत्री साहेबांनी येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले.तर राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय अजित दादांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून लवकरच गुन्हे माघे घ्यायला लावू असे आश्वासन दिले.यावेळी माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे,बापुजीबुवा देवस्थान चे अध्यक्ष श्री.श्रीरंग ज्ञानोबा धोदाडे, दलित पँथर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री.महेद्रंभाऊ वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांतभाऊ घुले, युवती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष कु.प्रतीक्षा ताई घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवा दलाचे अध्यक्ष महेश भाऊ झपके व बोपखेल मधील कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *