महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नांदेड – संजीवकुमार गायकवाड -, दि. 1२ : १४ व्या वित्त आयोग निधीतून मतदारसंघातील माझ्या #सोनखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाविरोधात लढण्यासाठी आज मा.आ.मोहन हंबर्डे यांच्या हस्ते यंत्रसामुग्री सुपूर्द करण्यात आली यामध्ये विशेष या कोरोना व्हायरस च्या प्रसारात अति महत्वाचे ईसीजी, मशीन, सॅनिटायजर , मास्क, फेशशिल्ड , हँडग्लोज , व अन्य महत्वपूर्ण व गरजू साहित्यांची नोंद आहे.नांदेड शहरात कोरोना संकटाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे ..
हे संकट ग्रामीण भागात येता कामा नये जर दुर्देवाने असा कुठला रुग्ण ग्रामीण भागात आढळून आला तर ग्रामीण आरोग्य व्यवस्था खंबीरपणे त्या संकटाचा सामना करू शकेल ह्या दृष्टीने आज साहित्य रुग्णालयाच्या सुपूर्द करण्यात आले… सोनखेड आरोग्य केंद्रावर निर्भर असणाऱ्या गावांची संख्या मोठ्या प्रमाणात असून आरोग्य केंद्राला आर्थिक दृष्ट्या मजबूत करने हेच माझं ध्येय आहे.असे मा.आ.मोहनअण्णा हंबर्डे यांनी सांगितले आहे.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. अली डॉ. राजूरकर तसेच मा.जिल्हा परिषद सदस्य मा.श्रीनिवासराव मोरे उपसरपंच अच्युत मोरे , गणेशराव मोरे व अन्य प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.