(औरंगाबाद) संभाजीनगर हादरले ; गुरुवारी करोनाचे सर्वाधिक १५५ रुग्ण आढळून आले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – संभाजीनगर – दि. 1२ : संभाजीनगर मध्ये अवघ्या नऊ तासांमध्ये सात करोना बाधितांनी उपचारादरम्यान प्राण गमावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या १२८ झाली असून जिल्ह्यात सारेच हादरले आहेत. दुसरीकडे गुरुवारी दिवसभरात करोनाचे सर्वाधिक १५५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या २४३० झाली आहे. काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १३६३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व सध्या ९३९ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १५५ बाधितांमध्ये जयसिंगपुरा, बेगमपुरा येथील १, मिसारवाडी १, सुभेदारी विश्रामगृहाजवळ १, उस्मानपुरा २, एन-आठ १, जुना बाजार १, आकाशवाणी परिसर १, उल्कानगरी १, संजय नगर २, एन-दोन सिडको १, गणेश कॉलनी १, बुढीलेन २, बायजीपुरा १, बंजारा कॉलनी ४, हेडगेवार रुग्णालय परिसर १, एमजीएम रुग्णालय परिसर १, शिवाजी नगर ५, उत्तम नगर ४, कैलास नगर ७, गादिया विहार १, सहकार नगर १, नक्षत्रवाडी १, चेलीपुरा १, टीव्ही सेंटर, पोलिस कॉलनी १, संजय नगर, बायजीपुरा ३, एन-सात सिडको १, न्यायनगर २, हुसेन कॉलनी १, संजय नगर, मुकुंदवाडी १, सातारा परिसर १, साईनगर, एन सहा २, एन-आठ सिडको, गजराज नगर १, पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा २, हरिप्रसाद अपार्टमेंट १, दशमेश नगर १, पद्मपुरा २, गांधी नगर ३, सिल्कमिल कॉलनी १, विशाल नगर ३, बेगमपुरा २, गोविंद नगर १, समता नगर २, फाजीलपुरा ४, न्यू हनुमान नगर ५, सिडको एन-आठ १२, गौतम नगर, घाटी परिसर २, रशीदपुरा १, मयूर पार्क म्हसोबा नगर १, भवानी नगर २, भारतमाता नगर ३, विजय नगर १, गारखेडा, गजानन नगर १, कोहिनूर कॉलनी १, जिल्हा परिषद परिसर २, हर्सुल सावंगी १, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर ३, टीव्ही सेंटर १, बिस्मिला कॉलनी ३, सिडको वाळूज महानगर-एक २, एकता नगर, हर्सूल परिसर १, बजाज नगर ८, साई नगर, पंढरपूर ३, जुनी मुकुंदवाडी ७, नारेगाव १, गंगापूर १, नायगाव १, सिल्लोड १, उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर १, वेदांत नगर १, एसआरपीएफ परिसर २, इटखेडा १, साईनगर, पंढरपूर १, शहागंज १, जटवाडा रोड १, शरीफ कॉलनी, रोशन गेट १, फतेह मैदान परिसर, फुलंब्री १, एसटी कॉलनी १, पैठण गेट १ व इतर ठिकाणचे २, अशा ९० पुरूष आणि ६५ महिलांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *