सरकारने नाभिक समाजाला दुकान ऊघडण्याची परवानगी दयावी नाही तर आर्थीक मदत जाहीर करावी:

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – पुणे : ता. 12: कोरोना मुळे उदभव्लेल्या संकटात नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे मात्र त्या कडे शासणाने पुर्ण पणे दुर्लक्ष केले आहे. शासन आमची मरणाची वाट पाहत आहे काय? असा वेदना वजा आरोप ” महाराष्ट्र नाभिक महामंडळा चे पुणे जिल्हा सरचिटणीस श्री. पुंडलिक सैंदाने यांनी केला आहे. दि. 09-06 2020 रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे वतीने अप्पर तहसीलदार कार्यालय, पिंपरी चिंचवड. येथे मोर्चा नेण्यात आला व तहसीलदार साहेबांकडे सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळणे बाबत किंवा आर्थीक मदत मिळणे बाबत निवेदन देण्यात आले आहे. कंटेनमेंट झोन सोडुन इतर भागांत सूक्ष्म, लघु उद्योजक व व्यवसाय करणारयांसाठी व खाजगी कार्या लयांसाठी लाॅकडावुन खुला केला आहे तर केस कटिंग दाढी साठी का नाही? आम्ही पण हातमोजे ,मास्क, सॅनीटायझर व ताप तपासून सेवा पुरवू , हातावर पोट असणारा नाभिक समाजाची व्यवसाया अभावी आर्थिकदृष्ट्या हाल होत आहेत. घरखर्च, सलुन दुकानाचे भाडे , लाईट बिल, वैद्यकीय खर्च, मुलांच्या शिक्षणाची काळजी व बॅंकेचे हप्ते कसे काय भागवायचे असा अनेक प्रश्न व्यवसायीकांना सतावत आहेत.

आधीच कोरोना आजाराची भयावह स्थितिमुळे अर्ध मेल्यागत जिवण जगत आहोत त्यातून सावरुन कुठेतरी पुर्व पदावर येण्यासाठी धडपड करावी दोन पैसे हातात आल्यावर उभारी मिळेल , दुकाने सुरु झाली की कुटुंबाला ही आधार मिळेल. असे वाटते. म्हणुन शासनाने आम्हाला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आर्थीक पॅकेज ची मदत करावी असे साकडे सरकारला निवेदनात घालण्यात आले आहे. सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आर्थीक पॅकेज ची मदत करावी………कोरोना आजार Covied 19 चे गांभीर्य आम्हाला पण आहे. व्यवसाय करतांना त्याचा प्रसार आमच्या कडुन होणार नाही याची आम्ही पण पुरेपुर दखल घेवु. शासनाच्याा नियमांनुसार नुसार आम्ही व्यवसाय करु…..आमची मागणी सरकारने लवकर मंजूर केली नाही तर समाज-व्यवसायिक वाट बघतील बघतील आणि शेवटी नाईलाजाने स्वयंस्फुर्ती ने दुकाने सुरु करतील आणि त्यातुन काही अनुचित प्रकार घडले त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असेही श्री. सैंदाने म्हणाले…………


मोर्चात श्री. गणेश वाळूंजाकर, श्री. अशोक मगर,श्री. सागर आढाव,श्री. मदन तांदळे, श्री. सचिन सूर्यवंशी, श्री. नसीम सलमानी, श्री. संदीप दळवी,श्री. अशोक पंडित श्री.आनंदा महाले व पिंपरी चिंचवड येथील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. शहरातील इतर संघटनानी ही मोर्चा त सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *