महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुन । Monsoon : ज्या ऋतूची सगळ्यांना वाट होती तो म्हणजे पावसाळा. पाऊस पडताच मात्र वातावरणात बदल होतात. तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात भाज्या निवडतानाही विशेष काळजी घ्यावी लागते. काही भाज्या पावसाळ्यात टाळणे कधीही चांगले.
पावसाळा आला की साथीचे आजार वाढतात. हे आजार वाढण्यामागे बदलते वातावरण, भाज्यांवरील किटक, वातावरणातील विषाणू असे बरेच घटक कारणीभूत असू शकतात.तेव्हा पावसाळा आला की काही भाज्या खाणे टाळले पाहिजे. कारण बहुतेक भाज्यांमध्ये पावसाळा आला की किडे आणि अळ्या पडायला सुरुवात होते.
पालक, मेथी, शेपू या भाज्यांमध्ये पावसाळ्यात हिरव्या अळ्या पडतात. भाज्यांचाही रंग हिरवा असल्याने भाज्यांमधील अळ्या सहसा दिसत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या खाणे टाळलेच पाहिजे. (Health)हिरव्या पालेभाज्यांव्यतिरिक्त कोबी आणि फ्लॉवर खाणं देखील पावसाळ्यात टाळलं पाहिजे. कारण पावसाळ्यात बहुतांश भाज्यांमध्ये अळ्या पडायला सुरुवात होते.
पावसाळ्यात मशरून खाणंदेखील टाळावं.पावसाळ्यात मशरूम खाल्ल्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात मशरुम खाल्ल्याने इलटी, पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात. (Monsoon) पावसाळ्यात शिमला मिर्ची खाणंदेखील टाळलं पाहिजे. पावसाळा सुरु झाला की शिमला मिर्चीत अळ्या पडायला सुरुवात होते.