Gold Silver Rate Today : सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या निच्चांकावर तर चांदी खरेदीची ही सुवर्णसंधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । जागतिक बाजारात सोने-चांदी तीन महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले आहे. भारतीय सराफा बाजारात हीच स्थिती आहे. वॅगनर ग्रुपच्या (Wagner Mercenary Group) बंडानंतर पुतिन यांच्या एकाधिरशाहीला मोठा शह बसला आहे. बाजारात अमेरिकन डॉलर अजून मजबूत झाला आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे दोन्ही मौल्यवान धातू दबावाखाली आले आहेत. किंमतीत बाबत जाणून घ्या  .

भारतीय सराफा बाजारात मे महिन्यापासून सतत पडझड सुरु आहे. आठवड्यात एकदा सोने-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ होते. गेल्या आठवड्यात 24 जून रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 150 रुपयांनी तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 160 रुपयांनी महागले. भाव अनुक्रमे 54,400 रुपये आणि 59,330 रुपयांवर पोहचले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी, 26 जून रोजी 22 आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 100 रुपयांनी महागले. किंमती अनुक्रमे 54,500 रुपये आणि 59,430 रुपयांवर पोहचले. आज 27 जून रोजी सकाळच्या सत्रात बातमी लिहीपर्यंत भाव अपडेट झालेले नव्हते. गुडरिटर्न्सनुसार या किंमती आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
सोमवारी, 26 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,726 रुपये, 23 कॅरेट 58,491 रुपये, 22 कॅरेट सोने 53,793 रुपये, 18 कॅरेट 44,045 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34355 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत जवळपास दोन हजारांची घसरण झाली होती. शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव 68,304 रुपये होता. त्यात एक हजारांची वाढ होऊन हा भाव 27 जून रोजी 69,392 रुपयांवर आला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *