Higher Pension Deadline: जास्त पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, शेवटची संधी चुकवू नका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPFO च्या सदस्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. ज्यांनी अद्याप सेवानिवृत्तीनंतर EPFO कडून जास्त पेन्शनसाठी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ईपीएफओने पुन्हा एकदा वाढीव पेन्शन योजनेत अर्ज करण्याची मुदत वाढवली असून यापूर्वी अंतिम मुदत २६ जून होती. ईपीएफओने सलग दुसऱ्यांदा वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असून आता ईपीएफओचे सदस्य ११ जुलैपर्यंत अर्ज करून शकतील.

उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदतीची ही दुसरी मुदतवाढ असून यापूर्वी, ती ३ मे २०२३ पासून २६ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती.दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPS (कर्मचारी पेन्शन योजना) अंतर्गत सदस्य उच्च निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करू शकतात. पात्र पेन्शनधारक/सदस्यांना येणारी कोणतीही अडचण दूर करण्यासाठी १५ दिवसांची शेवटची संधी दिली जात आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ते खालीलप्रमाणे समजून घ्या.


EPFO जास्त पेन्शनसाठी अशाप्रकारे अर्ज करा!
ई-सेवा पोर्टलला भेट द्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
उजव्या बाजूला असलेल्या पेन्शन ऑन हायर सॅलरी पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल.
त्याच्या Click Here पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाचा UAN, नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
यानंतर, नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करा.

लक्षात घ्या की फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच जास्त पेन्शनचा लाभ मिळेल, ज्यांचे EPS-95 चे सदस्य असताना EPFO ने जास्त पेन्शनचा पर्याय स्वीकारला नाही. EPFO ने १ सप्टेंबर २०१४ नंतर पीएफ खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPS द्वारे उच्च निवृत्ती वेतन निवडण्याचा पर्याय दिला असून या अंतर्गत १५,००० पेक्षा जास्त कमाई करणार्‍यांना देखील आता EPS मध्ये ८.३३ टक्के योगदान देण्याची संधी दिली जाईल, जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतर अधिक पेन्शन मिळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *