महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – सांगली – : जिल्ह्यात कोरोनाच्या आकड्यात पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे नवे १३ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आज अखेर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह संख्या २१९ इतकी झाली आहे.
शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ५ व्यक्ती तसेच पनुब्रे येथील १, खेड येथील १, माळेवाडी येथील १ व्यक्ती पॉझिटिव्ह आले. मणदूर येथे सापडलेले ५ व्यक्ती स्थानिक आहेत. तर पनुब्रे, खेड, माळेवाडी येथील व्यक्ती मुंबईहून आल्या आहेत.
पलूस येथे मुंबईहून आलेल्या बाधित ८८ वर्षीय महिलेची ६७ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह आली आहे. खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील ६० वर्षीय महिला व भिकवडी बुद्रुक येथील ५८ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. ते मुंबईहून आले आहेत. तर बुधगाव (ता. मिरज) येथे मुंबईहून आलेली ५६ व ५० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. असे एकूण १३ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे