राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापन दिन तसेच जागतीक पर्यावरण दिनाचे साधले औचित्य
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – तळेगाव दाभाडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापन दिन तसेच जागतीक पर्यावरण दिनानिमित्त १० जून रोजी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला उस्फुर्तपणे प्रतिसाद देत राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले. यामध्ये तळेगाव दाभाडे येथील तुषारदादा काळोखे युवा मंच आणि अंबिका प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जनरल हॉस्पिटल येथील गरवारे ब्लड बँक येथे १० जून ते १२ जून दरम्यान तीन दिवसीय रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३४ जणांनी रक्तदान केले तर ४२ जण हीमोग्लोबिन अभावी रक्तदान करू शकले नाहीत, तर पहिल्यांदाच 14 जणांनी रक्तदान केले. अशी माहिती तुषार काळोखे यांन महाराष्ट्र २४ ला दिली.
पर्यावरण दिनानिमित्त १०१ वृक्षांचे रोपण…
तसेच पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडे लावा, झाडे जगवा उपक्रमांतर्गत १०१ झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे सध्याच्या महामारीच्या संकटात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत असल्यामुळे सुमारे २५० कुटुंबांना किमान २ महीने पूरेल एवढे रेशन वाटप करण्यात आले.
यावेळी यांची होती उपस्थिती…
या रक्तदान शिबिरामध्ये आमदार सुनील आण्णा शेळके, रामदास काळोखे, विलास काळोखे, कौशल्या काळोखे, मयूर काळोखे, विजय काळोखे, सुनिता काळोखे, सूर्यकांत काळोखे, रवि साबळे, गणेश आमले, अनिल घुले आदी उपस्थित होते.
*प्रतिक्रिया*
आपण समाजाचे काही देणे लागतो. याच भावनेतून सामाजिक उपक्रम राबवित असताना मला माझ्या वडिलांन कडून नेहमीच समाजकार्याचे बाळकडू मिळाले. याचाच एक भाग म्हणून आम्ही कोरोना महामारीत रक्त कमी पडत असल्यामुळे भव्य रक्तदान शिबिर शिबीराचे आयोजन केले. यामध्ये अनेकांनी चांगल्या भावनेने प्रेरित होऊन प्रथमच रक्तदान केले आहे. त्याचप्रमाणे आमच्या युवा मंचच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले.
*-तुषार काळोखे,*
सामाजिक कार्यकर्ते+