पुण्यात वैशाली हॉटेलमध्ये टोळक्याकडून तोडफोड, कामगारांना मारहाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुन । फर्ग्युसन रस्त्यांवरील प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये टोळक्याने धुडगूस घालून कामगारांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी चौघांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इरफान शेख, सुशील सांडभोर, विश्वजित जाधव आणि चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निकिता जगन्नाथ शेट्टी यांनी फिर्याद दिली आहे. टोळक्याने हॉटेलमध्ये घुसून कामगारांना शिवीगाळ केली. सिसिटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. कामगारांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बंदुकीचा धाक दाखवून वैशाली हॅाटेलचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. वैशाली हॅाटेलचे कुलमुख्यत्यारपत्र बंदुकीच्या धाकाने नावावर करून घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विश्वजीत विनायकराव जाधव (वय ३८) यांच्यासह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *