महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुन । टीम इंडिया सध्या मैदानापासून लांब आहे. पण भारतीय क्रिकेटमध्ये Action सुरु झालीय. देशांतर्गत क्रिकेटमधील पहिली टुर्नामेंट दुलीप ट्रॉफी सुरु झालीय. वेगवेगळ्या झोन्समध्ये होणाऱ्या या टुर्नामेंटमध्ये अनेक क्रिकेटर्स आपली ताकत दाखवून देतायत. टुर्नामेंटच्या दुसऱ्या दिवशी एका क्रिकेटरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हर्षित राणा हा प्लेयरट नॉर्थ झोनकडून खेळतोय. त्याने नवव्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरुन थेट 75 चेंडूत शतक ठोकलं. मूळात म्हणजे हर्षित गोलंदाज आहे.
नॉर्थ झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन दरम्यान 28 जूनपासून सामना सुरु झाला. दिल्ली, पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या अनुभवी खेळाडूंसमोर नॉर्थ-ईस्टची टीम कमकुवत आहे. या मॅचमध्ये नॉर्थची टीम प्रभावी ठरेल, असा अंदाज होता. घडलं सुद्धा तसच. या मॅचमध्ये नवव्या नंबरवर येऊन एक फलंदाज शतक ठोकेल याची कोणीच कल्पना केली नव्हती.
12 फोर, 9 सिक्स
मॅचच्या दुसऱ्यादिवशी हर्षित राणा स्फोटक इनिंग खेळला. राणाने फक्त 75 चेंडूत शतक ठोकलं. हे त्याच्या फर्स्ट क्लास करियरमधलं पहिलं शतक आहे. 21 वर्षाचा दिल्लीचा हा गोलंदाज .या इनिंगआधी फक्त 5 सामने खेळला होता. त्याने 152 धावा केल्या होत्या. हर्षित राणा 86 चेंडूत नाबाद 122 धावांची इनिंग खेळला. यात त्याने 12 चौकार आणि 9 सिक्स मारले. 102 धावा त्याने फक्त फोर-सिक्सने केल्या.