Maharashtra Politics : राज्यात राजकीय घडामोडींना वेग ! ‘या’ नेत्यांची मंत्रीपदं अडचणीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुन । राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या आगामी निवडणूकांची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान राज्याती मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी वेग घेतला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्रामध्ये तसेच राज्यात देखील मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तारातून काही अकार्यक्षम मंत्र्यांना वगळले जाणार असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर अशा मंत्र्यांची नावे देखील समोर आली आहेत.

काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीला रवाना झाले होते. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रात्रीच म्हणजेच २ वाजता महाराष्ट्रात परत आले. या सर्व घडामोडींदरम्यान राजकीय हलाचालींना वेग आला आहे.

या मंत्र्यांची पदे धोक्यात..
काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर भाजपमधील वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर शिंदे गटालीत काही मंत्र्यांची पदे जाणार असल्याचे देखील बोलले जात होते. यादरम्यान सुत्रांकडून राज्यातील मंत्रीपद अडचणीत असलेल्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार (कृषी मंत्री), संदीपान भुमरे (रोजगार हमी व फलोत्पादन) आणि संजय राठोड (अन्न व औषध प्रशासन) यांचं मत्रीपद धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रात शिवसेनेला मिळणार मंत्रीपद
इतकेच नाही तर केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रात अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील भाजपच्या महाराष्ट्रातील २ अकार्यक्षम मंत्र्यांच्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. यामध्ये एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री पदाचा समावेश असेल आणि हे पद कोणाला द्यायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवला आहे.

लवकरच मिनिस्टर ऑफ कौन्सिलची बैठक
दिल्ली येथे 3 जुलै रोजी मिनिस्टर ऑफ कौन्सिल ची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या बैठकीत मंत्र्यांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड तपासलं जाणार असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या बैठकीला महत्व आलं आहे.

बैठीकनंतर मंत्र्यांची काम तापासून काही मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या मंत्र्यांच्या नावावर शिकमोर्तब होण्याची शक्यता आहे. ही बैठक प्रगती मैदानाच्या कनव्हेन्शन सेंटर ला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *