महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जुन । हल्ली तरुणांचे केस पांढरे तर होतातच पण ते गळू देखील लागले आहे. ही समस्या सध्या आजार बनत आहे. १०० पैकी ९० टक्के लोकांना केस गळती, अकाली केसांचे पिकणे, केसांची वाढ खुंटणे व यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
केसांच्या सततच्या गळण्यामुळे आपल्याला टक्कल पडण्याची भीती वाटू लागते. वयात येण्यापूर्वीच केस पांढरे होतात असे अनेकांचे म्हणणे आहे. केसांना पुन्हा काळे व घनदाट करण्यासाठी अनेक लोक बाजारातील महागडी उत्पादने वापरतात. परंतु केमिक्लसच्या वापरामुळे केस अधिक कमकुवत होतात.
ज्यामुळे पांढरे केस (Hair), केस गळणे आणि कोरडेपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना नैसर्गिकरित्या काळे करू शकता. आपल्या स्वयंपाकघरातील (Kitchen) चहापत्ती खूप फायदेशीर ठरु शकते. या छोट्याशा उपायाने केस काळे, लांब आणि चमकदार होतील. चहापत्तीचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया
1. चहाच्या पानाच्या पांढरे केस काळे होतील
जर तुम्हाला महागड्या केसांची उत्पादने वापरुन कंटाळा आला असेल तर तुमच्या स्वयंपकाघरात असणारी चहापत्ती फायदेशीर (Benefits) ठरेल. चहापत्ती ही केसांना रंग देण्याचे काम करेल. हे केसांमध्ये कोलेजन वाढवते. पांढरे केस कायमचे काळे होतात.
2. कसा कराल वापर ?
कॉफी पावडरमध्ये चहाच्या पानाचे पाणी मिसळा. त्याची पेस्ट बनवून मास्कप्रमाणे केसांवर लावा. यासोबतच तुम्ही मेंहदीसोबत चहाच्या पानाचे पाणी मिसळून मास्क तयार करू शकता आणि केसांना लावू शकता. ज्यामुळे पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होईल.
3. केसांची वाढ
केस गळती रोखण्यासाठी व केसांच्या वाढीसाठी चहाच्या पानांचे पाणी देखील खूप प्रभावी आहे. यासाठी 3 ते 4 चहाच्या पिशव्या पाण्यात टाका. पाच ते सहा तासांनी या पाण्याने केस धुवा. या पाण्याने केसांच्या टाळूला मसाज करा किंवा आपण स्प्रे देखील करु शकतो. तासाभरानंतर केस धुवा. आठवड्यातून किमान दोनवेळा असे केल्याने केस वाढू लागतात. ज्यामुळे केसांच्या टाळूमधील रक्त परिसंचरण सुधारुन केसांच्या वाढीस गती देते. केस काळे होण्यासोबतच चमकदारही होतात.
4. केसांना चमकदार बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
केस काळे आणि चमकदार बनवण्यासाठी चहाच्या पानाचे पाणी खूप प्रभावी आहे.
हे केसांची चमक वाढवण्यासोबत कंडिशनरचे काम करते.
हे बनवायलाही खूप सोपे आहे. यासाठी प्रथम चहाची पाने पाण्यात उकळा.
आता ते गाळून थंड होऊ द्या. यानंतर एलोवेरा जेल पाण्यात मिसळून लावा.
अर्ध्या तासानंतर केस धुवा. आठवड्यातून किमान दोनदा हे करा. यामुळे तुमचे कोरडे केस चमकदार होतील.
टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.