LPG Cylinder Prices July 1: एलपीजी सिलेंडरच्या किंमती आज स्वस्त की महाग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । १ जुलै रोजी म्हणजेच आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार १४.२ किलो एलपीजी सिलिंडर आणि १९ किलो व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशाप्रकारे आज देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची किंमत १७७३ रुपये आहे. जून महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ८३ रुपयांनी कमी झाली होती तर मे महिन्यातही व्यावसायिक सिलिंडर १७२ रुपयांनी स्वस्त झाले होते.

याशिवाय देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ११०२.५० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरचा भाव १७२५ रुपयांवर स्थिर आहे. तसेच इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये एक एलपीजी एलपीजी सिलिंडर १११८.५० रुपयांना विकला जात असताना व्यावसायिक १९३७ रुपयाला विक्री होत आहे. सिलिंडरच्या किमतीत गेल्या वर्षभरात चढउतार पाहायला मिळाले आहेत.

घरगुती एलपीजीच्या किमती कधी वाढल्या?
गेल्या वर्षी ६ जुलै २०२३ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ नोंदवली होती. आजपर्यंत देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०५३ रुपये, ज्यात ५० रुपये वाढ होऊन ११०३ रुपये झाली आहे. म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती एका वर्षापासून स्थिर आहेत.

व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत
दुसरीकडे, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढउतार सुरूच आहे. दिल्लीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७६९ रुपये राहिली, ज्यात मार्च २०२३ मध्ये वाढ झाली आणि दर २११९.५० रुपयांवर पोहोचली. तर एप्रिल आणि मे मध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती अनुक्रमे २०२८ रुपये आणि १८५६.५० रुपयांवर घसरल्या. लक्षात घ्या की घरगुती सिलिंडर १४.२ किलोचे, तर व्यावसायिक सिलिंडर १९ किलोचे असते.

तुमच्या शहरातील LPG गॅस सिलिंडरचा दर इथे तपासा
तुम्हाला एलपीजी सिलेंडरची किंमत तपासायची असेल, तर तुम्ही इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://iocl.com/prices-of-petroleum-products वर जाऊन तपासू शकता. येथे तुम्हाला LPG व्यतिरिक्त इतर गोष्टींचे अपडेट्स देखील मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *