महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । Pune Police – सरार्इत गुन्हेगाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही कठोर कारवाई केली नाही, असा ठपका ठेवत वारजे पोलिस ठाण्यातील तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात जणांना शहर पोलिस दलातून निलंबित केले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश शनिवारी (ता. १) काढले.
कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलिस आयुक्तांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू सायप्पा हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे,
उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, उपनिरीक्षक जनार्दन नारायण होळकर, पोलिस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.