बुलढाणा बस अपघातातील २४ मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । शनिवारी मध्यरात्री सिंदखेडराजा तालुक्यातील समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालं होता. मृतदेह जळाल्याने सगळ्या मृतकांची नावे समोर आली असली कोणता मृतदेह कुणाचा हे ओळखणे कठीण झाले. फॉरेन्सिक टीमने २४ तास प्रयत्न केले तरी सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी करून मृतदेह कुणाचा हे कळायला कमीतकमी पाच दिवस लागतील असे सांगितले जात आहे.

मात्र, जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ३ दिवसांपेक्षा अधिक वेळ ठेवणे कठीण आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी मृतदेह ताब्यात देताना येणाऱ्या अडचणसंदर्भात नातेवाईकांशी चर्चा केली. सर्वांनी मिळून बुलडाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आज, सकाळी साडेनऊ वाजता २५ मृतदेहांपैकी २४ जणांवर बुलडाणा शहरातील त्रिशरण चौक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांपैकी एक मृतदेह हा नागपूर येथील झोया या मुस्लिम तरुणीचा आहे. रात्री उशिरा तिचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहचले. आम्हाला मृतदेह दफन करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार श्वेताताई महाले यांनी रात्री दोन पर्यंत झोयाच्या नातेवाईकांशी चर्चा केली. आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह ओळखता येईल असे तिचे नातेवाईक म्हणाले.

२५ पैकी एका मृतदेहाचा चेहरा आणि शरीराची ठेवण पाहून तो मृतदेह झोयाचा असल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. त्यामुळे झोयाच्या नातेवाईकांनी दावा केलेला मृतदेह सोडून उर्वरित २४ जणांवर आज अंत्यविधी करण्यात येणार आहे. “त्या” मृतदेहाची डीएनए चाचणी केल्यानंतर तो मृतदेह झोयाचाच असल्याचे निश्चित झाल्यावर तो तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. मात्र तसे निष्पन्न न झाल्यास त्यावर सुद्धा विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येतील असे मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने निश्चीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *