महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । राजकीय वर्तुळात आज मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज अजित पवार यांच्यासह 9 जणांचा मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Latest Marathi News)
यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परकर परिषद घेत याबाबतची आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मला आनंद आहे. आज मंत्री मंडळामध्ये ज्या नेत्यांनी शपथ देण्यात आली त्या नेत्यांवर केलेले आरोप खोटे असल्याचे त्यांनी दाखवले आहे’ असं शरद पवार म्हणालेत.(Latest Marathi News)
तर पुढे ते म्हणाले, 6 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली होती, मात्र त्याआधी काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते. तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.
पुढे ते म्हणाले, मला आठवतंय की, १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो. त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले सगळे नेते पक्ष सोडून गेले. मी ५८ जणांचा विरोधी पक्षनेता झालो होतो. पण त्यानंतर मी पाचच लोकांचा नेता राहिलो. मी ५ लोकांना घेऊन पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात निघालो होतो. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक झाली त्यामध्ये आमची संख्या ६९ वर गेली. संख्या वाढली. नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी तीन ते चार जण सोडले तर सगळे पराभूत झाले. त्यामुळे १९८० साली जे चित्र दिसलं ते चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर कसं उभं करता येईल, हा माझा एककलमी कार्यक्रम राहील असं ते म्हणाले आहेत.
तर त्यावेळी ज्यांनी पक्षाला सोडलं त्यापैकी 3 ते 4 जण सोडले तर सर्वजण पराभूत झाले. माझा राज्यातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. मी फक्त काही जणांचा नेता होतो, मी पक्ष पुन्हा बांधला. जे घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला तर मी लोकांमध्ये जाणार असंही शरद पवार पुढे म्हणाले आहेत.