![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । शहरात 24 जूनपासून सतत सहा दिवस पाऊस सुरू होता. त्यामुळे सूर्यप्रकाश पडला नव्हता. रविवारी सहा दिवसांनंतर प्रथमच कोवळी उन्हं शहरात पडली आणि काही काळ ऊबदार वातावरण तयार झाले होते. शहरात मोठा पाऊस झालेला नसला, तरीही गेले सहा दिवस भिजपाऊस सुरू होता. त्यात रविवारी काही तासांचा खंड मिळाला.
सकाळी 8 वाजता सूर्यदर्शन झाले. त्यामुळे शहरातील गारवा कमी झाला. ठिकठिकाणी साचलेली डबकी आणि चिखल कमी होण्यास मदत झाली. मात्र, दुपारी 11 च्या समारास काही भागांत रिमझिम पाऊस झाला, त्यानंतर पुन्हा उन्हं पडले. शहरात रविवारी पावसाचा जोर कमी झाला तसेच वातावरण सोमवारी राहील. मात्र, 4 जुलैपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी झालेला पाऊस
शिवाजीनगर 3
पाषाण 2
चिंचवड 3.5
लोहगाव 1.2
मगरपट्टा 0.5
