महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । राज्यातील सत्ताकारण जोरात सुरू असतानाच सामान्य माणूस मात्र महागाईच्या आगीत होरपळून निघतोय. तीन आठवड्यांपासून टोमॅटोचे भावाने महागाईचा शिखर गाठलाय. आजमितीला बाजारात टोमॅटोसाठी तब्बल १६० रुपये मोजावे लागत आहेत. तर कोथिंबीर जुडीसाठी थोडथोडके नव्हे तर चांगले ४०० रुपये मोजावे लागत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांत सुरू असलेल्या पावसाचा टोमॅटोसह इतर भाज्यांना फटका बसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान टोमॅटोसह भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असून घरचं बजेट कोलमडून गेलंय. पण या वाढीव दराचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतोय का, हाच खरा प्रश्न आहे.