खाजगी संस्थेसाठी महापालिकेकडून देण्यात येत असलेल्या पाच कोटींच्या निधीसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दर्शविला तीव्र विरोध

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । निगडी । पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने स्व.यशवंतराव चव्हाण स्मारक खाजगी संस्था कार्यरत असून, सन २०१८ रोजी स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना यशवंतराव चव्हाण स्मारक खाजगी संस्थेसाठी पाच कोटी अनुदान देण्याबाबत मागणी केली होती. त्या संदर्भात निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी विरोध केला होता. त्यावेळी मात्र महापालिकेकडून अनुदान देण्यास नकार देण्यात आला होता. मात्र आता पुन्हा आमदार अश्विनी जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना पाच कोटी अनुदान देण्याबाबत मागणी केली आहे. परंतु, पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी विरोध केले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, यशवंतराव चव्हाण स्मारक ही खासगी संस्था आहे. आणि खासजी संस्थेला निधी देण्याचे महापालिकेला 3 लाख रुपयांचीच मर्यादा आहे. मात्र आमदार अश्विनी जगात यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी महापालिकेने 5 कोटी रुपये द्यावेत, यास मान्यता दिली आहे. परंतु, या खासगी संस्थेला निधी न देता हा निधी शहरातील विविध योजना, दिव्यांंगासाठी योजना, शहरातील जलतरण तलाव, तसेच छोटी मोठी विकासकामे यांसाठी हा निधी वापरावा म्हणून यशवंतराव चव्हाण खासगी संस्थेच्या या एव्हढ्या मोठ्या स्वरुपाचा निधी मिळू नये म्हणून काळभोर यांनी विरोध दर्शविला आहे.

विशेष बाब म्हणजे, निगडी-प्राधिकरणातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे अद्ययावत स्मारकाची संपूर्ण इमारत बांधण्याचा खर्च १५ कोटी रुपये एव्हढा आहे. या स्मारकाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निधीतून पाच कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. आमदार अश्‍विनी जगताप यांनी या मागणीचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे केला. त्यांनी स्मारकाला पाच कोटी रुपये अनुदान देण्याचे तत्काळ जाहीर केले. थेरगाव येथे शुक्रवारी (ता. १६) आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावेळी शिंदे यांना स्मारकाचे शिष्टमंडळ भेटले. यावेळी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र दिले. जगताप यांनी दिलेल्या पत्रात ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रभर राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणामुळे पिंपरी चिंचवडसह संपूर्ण राज्यात उद्योगधंदे सुरू होऊन, अल्पावधीतच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपास आले. याच कार्याची स्फूर्ती भावी पिढ्यांना मिळावी म्हणून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीमार्फत उद्योग नगरीतील निगडी प्राधिकरणातील ४४ गुंठ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे अद्ययावत स्मारक करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सर्व सुविधांसह स्मारकाचा आराखडा मंजूर करून, चार मजल्यापर्यंतचे इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

संपूर्ण इमारत बांधण्याचा खर्च अंदाजे १५ कोटी रुपये आहे. परंतु; स्मारकाचे काम पूर्ण न होऊ शकल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे स्मारकाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निधीतून पाच कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे.’ असे म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात ‘यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती व कार्याची माहिती भावी पिढीला व्हावी, या शुद्ध हेतूने पिंपरी चिंचवड शहरातील निगडी-प्राधिकरण येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला पाच कोटी रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *