महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै ।
तुळशीच्या पानांची चहा : तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. तुळशीच्या पानांचा वापर वर्षानुवर्षे आजारांतून बरे करण्यासाठी होतो. तेव्हा याच तुळशीच्या पानांचा उपयोग चहा बनवण्यासाठी केला तर याचहामुळे तणाव, चिंता, डिप्रेशन, डोकेदुखी, सर्दी, खोकल्यापासून आराम मिळू शकतो. तुळशीच्या चहामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तेव्हा अशी चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती, पचनक्रिया आणि त्वचेला देखील अनेक लाभ होतात.
मिंट चहा : मिंटच्या पानांमध्ये मेन्थॉल, आणि लिमोनिनसह अनेक आवश्यक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असू शकतात. मिंट चहाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या कमी होण्याबरोबरच डोकेदुखी, नाक चोंदणे आणि ऍलर्जीपासून मुक्त होण्यास मदत मिळते. हा चहा मूड फ्रेश ठेवण्यास मदत करतो.
ग्रीन टी : ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. ग्रीन टी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. पावसाळ्यात ग्रीन टी प्यायल्याने संसर्ग रोखण्यास मदत होते. ग्रीन टी शरीरातील टॉक्सिक एलीमेंट्स बाहेर काढण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यासही प्रभावी ठरते.
आल्याची चहा : पावसाळ्यात आल्याची चहा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते. आल्याची चहा एलर्जी कमी करून सर्दी खोकल्यापासून आराम देण्यासाठी परिणामकारक ठरते. पावसाळ्यात पोटाच्या समस्या देखील बळावतात अशावेळी आल्याची चहा पचनक्रिया नीट ठेवण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
कॅमोमाइल चहा : कॅमोमाइल चहा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. हा चहा अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध मानला जातो, विशेषतः हा चहा पावसाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असतो. या ऋतूमध्ये त्वचेच्या समस्या तसेच सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन यांसारखे अनेक संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी हा चहा उपयुक्त असतो.