महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – उदगीर – विशेष प्रतिनिधी – जीवन भोसले – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत 80 दिवसांच्या कालावधीत लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने तब्बल 23 हजार 870 वाहनांवर कारवाई करण्यात आली .यातून 84 लाख 98 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सरासरी प्रतिदिन लाखांचा दंड वसूल केला आहे. सदरची कारवाई महाराष्ट्रात विक्रमी ठरली आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाने गत 22 मार्चपासून जिल्हाभरात विविध मार्गावर नाकाबंदी सुरू केली आहे. दरम्यान,बेशिस्त वाहनांना लगाम घालण्या साठी वाहतूक शाखेनेही कंबर कसली असून 80 दिवसात कोटींचे उड्डाण घेतली आहे. यातून 24 हजार वाहनांवर कारवाई करत 84 लाख 98 हजाराचा दंड वसूल केला .
राज्यात लातूर जिल्हा दुसर्या स्थानी आहे. या विक्रमी कारवाईत नागपूर नंतर लातूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. विनाकारण फिरणे , नियम मोडणे वाहनधारकांना चांगलेच महागात पडले आहे.या कालावधीत अनेक वाहने पोलीसांनी जप्त केल्याचे सुत्रांनी सांगीतले,
लातुरात दिवसभरात 548 वाहनावर कारवाई केली आसुन यातून 1 लाख 74 हजार 100 रुपयांचादंड वसूल केला आहे, लातुरातील रस्त्यावर बेशिस्त थांलेलेल्या 49 वाहनांना टोईंग वाहनाने उचलण्यात आले आहे.
लातूर सह जिल्ह्यातील विविध मार्गावर बेशिस्त अन् विनाकारण फिरणार्या वाहन चालकांवर पोलीसांनी रोख अन् आँनलाईन कारवाई केली आहे. बहूतांश वाहनधारकांनी नियम मोडल्याचे समोर असुन, अशा वाहनावर गुन्हे दाखल केल्याची माहिती लातूर शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक एस.यू पटवारी यांनी दिली.