महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – उद्धव मामडे – उमरी – नांदेड : उमरी तालुक्याच्या ठिकाणी एकच ग्रामीण रुग्णालय आहे.या रुग्णालयाला जवळपास 67 गावे तांडेवाडी जोडले आहे . या ग्रामीण रुग्णालयात तिस खाटाचे आहे.शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रूग्ण मोठया प्रमाणात या ठिकाणी येतात.दररोज जास्त रूग्ण येत असल्याने ठिकाणी जागा अपुरी पडते आहे .सदर इ.स.1980च्या दशकातील इमारत असल्याने हि इमारत खिळखिळ झाली आहे.ही इमारत पावसाळ्यात जागोजागी गळतेआहे.ऑपरेशन थेटरस् बरेच वर्ष बंद असल्याने प्रस्तुतीच्या महिलेचे प्रसूतीसाठी कुचंबणा होते.सध्या तर प्रसूतीसाठी सुविधा नसल्याचे काही नाॅर्मल प्रसूती महिलेच्या बोटावर मोजण्या इतके या ग्रामीण रुग्णालयात होतात.तर काही गंभीर प्रसूती महिलांना खाजगी रूग्णालयात रेफर केल जातात. त्यामुळे सामान्य जनतेला आर्थीक फटका सहन करावा लागत आहे.रुग्णा सोबत आलेल्या नातेवाईकांना बसण्याची, जेवण्याची, झोपन्याची व राहण्याची सोय नसल्यामुळे त्रास सोसावा लागत आहे .
या ग्रामीण रुग्णालयाचा कार्यभार प्रभारी वैद्यकीय अधिक्षकाकडे आहे. या ठिकाणच्या काही रुग्णाला लागणाऱ्या मशीन बंद असल्याने रुग्णांना समस्या पुढे जावे लागले आले.त्यासाठी पुर्ण वेळ देणारा सध्या जिल्यात बाहेरून आलेल्या रहिवाशीनं मुळे कोरोना या विषाणू चा वाढतात शिरकाव बघून तरी कायम स्वरूपी वैद्यकीय अधिष्ठाता नेमण्याची गरज आहे.या रूग्णालयात दोन स्त्रीरोगतज्ज्ञ व दोन बालरोगतज्ज्ञ ,तिन आयुष्य ,दोन आ,बि.एस.के.वैद्यकीय अधिकारी,एक दंत चिकित्सक ,एनसिडी वैद्यकीय अधिकारी,नऊ आधी परिचारिका एक लॅब टेक्सीयन, एक्स रे टेक्सीयन, दोन फाॅरमसी, तिन वैद्यकीय अधिकारी, मिश्रक चे एक लॅब ऑस्सीन, दोन कर्लक,एक कार्यालयीन अधीक्षक, पाच सेवक सह डाॅक्टर व कर्मचारी संपुर्ण स्टाॅप आहे.या ठिकाणी दररोजची ओ.पी.ड्डी.त तिनशे ते चारशे रूग्ण येत असल्याने यात सर्दी, खोकला, ताप, मळमळ,संडास, उलट्या, त्वचेचे रूग्ण व इत्यादी तर अतिगंभीर रुग्णांमध्ये साप विचु,विष.जळालेले,दुर्घटनाग्रस्त,दमा, ह्रदयविकार,प्रसूती ,एम. एल. सी.शवविच्छेदन आधी रूग्ण येत असताना आता सर्वात जास्त सर्पदंश चे रूग्ण मोठया प्रमाणात ग्रामीण भागातून येतात रूग्णांना डॉक्टरांची निदान वेळाने मिळाला तर तो रूग्ण वाचतो अन्यथा डाॅक्टर वेळात नाही मिळाल्यास रूग्ण दगावतो.
असे अनेक ग्रामीण रुग्णालयात डाॅक्टर वेळेवर मिळाले नसल्याने रूग्ण दाखवले.या ग्रामीण रुग्णालयातचे डाॅक्टर खाजगी रूग्णालयाकडे जास्त वेळ देत असल्याने ग्रामीण रुग्णालयात वेळ देत नाहीत. या ग्रामीण रुग्णालयाला प्रभारी वैद्यकीय अधिक्षकाकडे चार्ज असल्याने ते हि दवाखान्यात नेहमी गैरहजर असतात ते मुख्यालयात राहत असल्याने येथील कर्मचार्यावर नियंत्रण नाही परिणामी कर्मचारी रुग्णालयात वेळाने येत नाही.बरचशे कर्मचारी हि अनुपस्थित असतांत तसेच रुग्णालयातील सोनोग्राफी एक्स रे सह सर्व मशनरी बंद आहेत.त्याचा परिणाम अती आवश्यक सेवेसाठी रूग्णांना एक खाजगी दवाखान्यात जावे लागते. किंवा नांदेड येथील शासकीय रूग्णालयात जावे लागते याकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून सर्व बंद पडलेल्या मशनरी चालू कराव्यात व आम्हाला पुर्ण वेळ देणारा वैद्यकीय अधीक्षक पाहिजे.अन्यथा या रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक नाही मिळाला तर या वैद्यकीय अधिक्षक यांना मुख्यालय मध्ये राहण्यास सागावे जेणे करुन रूग्णांची हेडसाळ व होणारा त्रास वाचवावा अंशी मागणी येथील नागरिकांची आहे.
