Raj Thackeray: अरे हा मुख्यमंत्री तात्पुरता मी पर्मनंट अधिकारी ; म.न.से.अध्यक्ष राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । राज्यात एकीकडे नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावर गेले आहेत. चिपळूणमध्ये राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्याचा उल्लेख व्यभिचारी तडजोड असा करत जोरदार टीकास्त्र सोडले. तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दलचा जो राग आहे तो तुमच्या मनातून बाहेर काढा. मला जर व्यभिचारी राजकीय तडजोड करायला लागली तर मी घरात बसेन, असे म्हणत त्यांनी राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींवर बोट ठेवले.

राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मी राजकारणी आहे आणि राजकारण करत असताना असे निर्णय घ्यावे लागतात असे सांगताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करून दाखवली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार व्हावा, आमदार व्हावा असं वाटतं. पण तसा खासदार व आमदार होण्यासाठी तशी व्यक्तीही असणे गरजेचे आहे. लोकांना वाटलं पाहिजे की हा आपले प्रश्न सोडवू शकेल. असा माणूस जिंकणे गरजेचे आहे. आपला पक्ष जिंकला पाहिजे. आता मेळाव्यात संख्या किती आहे, असे विचारत ५१५ यांचा व्हाट्सअप चा ग्रुप झाला पाहिजे. होईल की नाही असे सांगत त्यांनी वैभव खडेकर यांचे नाव घेत यांना सगळ्यांना हाकायचे काम करा, म्हणजे ती गुरे नाहीत हे लक्षात ठेवा असे सांगितले.

या सगळ्याची जबाबदारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष यांच्यावर दिली आहे. पक्षाची शाखा नव्हे तर नाका झाला पाहिजे. तुम्ही संध्याकाळी जाताना तोच नका असे विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. उद्या हाच नका महिलांना व युवतींना मोठा आधार वाटला पाहिजे हे लक्षात ठेवा असाही महत्वाचा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.

पुण्यात सध्या काय चाललं आहे यांचे त्यांनी उदाहरण दिले. एका आयएस अधिकाऱ्यांचा दाखला देत राज ठाकरे यांनी सांगितले की, तो आयएएस अधिकारी मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरत होता. त्याला विचारल्यावरती त्यांनी सांगितलं की, ‘अरे तो मुख्यमंत्री टेम्पररी आहे, मी परमनंट आहे’ असे सांगताना राज ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नमोल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *