![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । Vegetable Storing Tips : पावसाळ्यात बाजारात भाजीचे निवडताना आणि घरी आणल्यानंतर या भाज्या साठवताना विशेष काळजी घ्यावी लागते. बाजारात तुम्ही भाज्यांवर पाणी शिंपडण्याचे दृष्य कधीतरी बघितलेच असेल. भाज्या ताज्या राहाव्यात यासाठी असे केले जाते. त्यामुळे भाज्या लवकर खराब होतात. अशा परिस्थितीत, आपण त्यांना दीर्घकाळ साठवण्यासाठी या काही टिप्स वापरू शकता.
व्यवस्थित धुवा
पावसाळ्यात भाज्या नीट धुणे फार महत्वाचे आहे. पावसाळ्यात फळांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची भीती असते. म्हणून, ते साठवण्यापूर्वी, कोमट पाण्यात व्हिनेगर मिसळून त्या भाज्या सोडा. यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवा.
भाज्या नीट सुकवा
भाज्या व्यवस्थित धुतल्यानंतर त्या नीट सुकवणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही भाज्या कोरड्या केल्या नाहीत तर त्या लवकर खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी भाज्या धुतल्यानंतर टिश्यू पेपर किंवा सुती कापडाने भाज्या पुसून घ्या.
भाज्या थंड्या जागेत साठवा
भाजीपाला व्यवस्थित धुऊन सुकवल्यानंतर थंड आणि हवेशीर जागेत साठवा. (Health)
पावसाळ्यात या भाज्या खाणे टाळा
पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळले पाहिजे. पावसाळ्यात पालेभाज्यांवर किटक आणि अळ्या असण्याची शक्यता असते. तेव्हा अशा भाज्या खाणे कटाक्षाने टाळा. तसेच शिळे अन्न खाणेसुद्धा टाळा. कारण शिळे अन्न पचायला जड असते. त्यामुळे तुम्हाला पोटाचे विकारही उद्भवू शकतात. (Vegetable)
शुद्ध पाणी प्या
पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाणी पिण्यात आले की अनेक आजार होतात, जसे की गॅस्ट्रो, कॉलरा. तेव्हा या सगळ्या आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पावसाळ्यात पाणी उकळून प्या.
