महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । England vs Australia 4th Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे, मात्र पहिले दोन सामने गमावल्यानंतर इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केले आणि सामना तीन विकेटने जिंकला.
तिसऱ्या सामन्यात मार्क वुडने इंग्लंडकडून चांगली कामगिरी केली आणि त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने सामना जिंकला. आता इंग्लंड संघाने चौथ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यामध्ये एका स्टार खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
संघात केला हा बदल
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना 19 जुलै रोजी खेळल्या जाणार आहे, मात्र त्याआधी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. जेम्स अँडरसनला संघात परत बोलावण्यात आले आहे. त्याचवेळी तिसऱ्या कसोटीत खराब कामगिरी करणाऱ्या ओली रॉबिन्सनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अँडरसनकडे प्रचंड अनुभव आहे, जो इंग्लंड संघासाठी उपयोगी पडू शकतो. अँडरसनने आतापर्यंत कसोटी सामन्यात 686 विकेट घेतल्या आहेत.
https://t.co/11eJ0XAeMl pic.twitter.com/OTnMgKU1Mv
— England Cricket (@englandcricket) July 17, 2023
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एक बदल केला आहे. सलामीसाठी त्याने बेन डकेट आणि जॅक क्रॉलीवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज जो रूटकडून इंग्लंडला पुन्हा चांगल्या कामगिरीची आशा असेल.