VIDEO: धोनीच्या गॅरेजमधील कार आणि बाईक्स पाहून व्यंकटेश प्रसाद झाला थक्क ; म्हणाला, ‘हे तर शोरुम…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । Venkatesh Prasad Shares Dhoni’s Bike & Cars Video: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग आणि त्याचे बाईक्सवरचे प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. धोनीकडे कार आणि बाईक्सचे अप्रतिम कलेक्शन आहे. आता माजी भारतीय खेळाडू व्यंकटेश प्रसाद धोनीचे बाईक कलेक्शन पाहून आश्चर्यचकित झाले. व्यंकटेश प्रसाद यांनी धोनीचे हे कलेक्शन पाहिले आणि ते शोरूम असू शकते असे सांगितले. याबाबत खेळाडू व्यंकटेश प्रसादने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्यंकटेश प्रसादने या कलेक्शनचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, “मी एका व्यक्तीमध्ये पाहिलेली सर्वात विलक्षण आवड आहे. काय कलेक्शन आणि काय माणूस आहे एमएसडी. एक महान यश आणि आणखी अविश्वसनीय व्यक्ती. त्याच्या रांचीच्या घरी बाईक आणि कारच्या कलेक्शनची ही एक झलक आहे. या माणसाला आणि त्याची आवड पाहून भारावून गेलो.”

या व्हिडीओमध्ये व्यंकटेश प्रसाद यांना प्रश्न विचारण्यात आला आहे की, “सर्वप्रथम, रांचीला आल्यानंतर तुम्हाला कसे वाटते? त्याला उत्तर देताना तो म्हणाला, “अद्भुत! नाही, रांचीमध्ये माझी पहिली वेळ नाही. ही माझी चौथी वेळ आहे, पण हे ठिकाण (एमएस धोनीचे बाईक कलेक्शन) वेडे आहे. तुमच्याकडे इतक्या बाईक असू शकत नाहीत जोपर्यंत कोणीतरी त्याबद्दल वेडा होत नाही.”

बाईक शोरूम असू शकते –
माजी भारतीय खेळाडू पुढे म्हणाला, “बाईकचे शोरूम होऊ शकते. मी तुम्हाला सांगतोय की इतर काहीही करण्यासाठी खूप उत्कटतेची गरज असते.” या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनीचे बाईक आणि कारचे कलेक्शन पाहता येते. त्यांच्याकडे विंटेजपासून ते लक्झरीपर्यंत गाड्यांची श्रेणी आहे.

धोनी आयपीएल २०२४ चा हंगाम खेळणार –
नुकताच ७ जुलै रोजी धोनीने त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा केला. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वीच हा सीझन धोनीचा शेवटचा सीझन असू शकतो, अशा बातम्या येत होत्या. मात्र, पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर धोनी म्हणाला की, त्याच्या चाहत्यांसाठी त्याला आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळायचा आहे. आयपीएल २०२३ मध्ये धोनीने १२ डावात १८२.४५ च्या स्ट्राइक रेटने १०४ धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *