महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । आजकाल लोक दिवसातील जास्त वेळ मोबाईलवर घालवतात. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच मोबाईलचा अतिवापर करतात. छोट्या कामांपासून मोठी कामं मोबाईलवर होतात. त्यामुळे मोबाईलचा जेवढा फायद्याचा तेवढाच त्याचा तोटाही आहे. कधी तुमच्यासोबत काय होईल सांगू शकत नाही. असाच एक प्रकार समोर आलाय ज्यामध्ये मोबाईलमुळे एक कपल रस्ता चुकलं आणि थेट समुद्रात गेलं. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊ या .
मोबईलवर GPS लावून कपल रस्ता चुकलं. मॅपला फॉलो करत ते चुकीच्या रस्त्याने गेले आणि थेट समुद्रातच गाडी घातली. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
पावसात गाडी चालवत असताना जीपीएस फॉलो करत जोडपं समुद्रात पोहोचलं आणि पाण्यात अडकलं. त्यांची अर्धी कार पाण्यात बुडाली. त्यामुळे तेथील स्थानिकांनी त्यांची बाहेर पडण्यास मदत केली. एक व्यक्ती तरंगत्या कारजवळ पोहोचली आणि त्यांना बाहेर काढलं. पाण्यात गाडी पुढे सरकत असल्याचं दृश्य व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. पाण्यात ओघात गाडी आणि कपल समुद्रात गेलं असतं मात्र नागरिकांच्या सकर्ततेमुळे ते वाचले.