पुण्यामध्ये आरटीओचे कामकाज आजपासून सुरु ,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे , – ता. १७ लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरटीओचे कामकाज पुर्ववत सुरु करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. यामुळे नागरिकांना आता वाहन नोंदणी, लायसन्स, फिटनेस तपासणीसह वाहन विषयक सर्व कामे करता येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करुन कामे सुरु ठेवण्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यासह देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला होता. परिणामी मार्च अखेरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे (आरटीओ) कामकाज बंद ठेवण्यात आले होते. यानंतर १८ मे पासून शहरातील आरटीओ कार्यालयाचे अंशतः कामकाज सुरू झाले. मात्र, पुणे शहर रेड झोनमध्ये असल्याने सध्या केवळ नव्या वाहनांची नोंदणी सुरु होती. यानंतर आता आरटीओतील उर्वरीत सर्व कामकाज सुरु करण्याची परवानगी आयुक्त कार्यालयाने दिली आहे. लॉकडाऊन नियमाच्या अधिन राहून हे काम सुरु ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. परवान्यासह इतर कामकाज सुरु करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, सुनिल चौधरी यांनी पाठपुरावा केला होता.

* शिकाऊ लायसन्ससाठी दोघांमध्ये ६ फुटांचे अंतर असावे
* अर्जदाराच्या चाचणीनंतर संगणक सॅनिटायझर करुन घ्यावे
* मास्क व हॅण्डग्लोज असल्यासच परिक्षेला परवानगी
* अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कोटा निश्चित करणे
* कार्यालयात गर्दी कमी ठेवण्यासाठी उपायोजना करणे
आरटीओतील कामकाजासाठी अधिकारी वर्गासोबत बैठक घेऊन येत्या दोन दिवसात आराखडा तयार केला जाईल. यानंतर सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे
पालन करुन प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्यात येईल- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link