महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – संभाजीनगर – ता. १७ जिल्ह्यात आज सकाळी 96 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3028 झाली आहे. यापैकी 1658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 163 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1207 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये राजीव नगर (1), समता नगर (2), पेंशनपुरा (1), भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), मसून नगर (1), पळशी (2), एन आठ सिडको (5), पुष्प गार्डन (1), गजानन नगर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), सेव्हन हिल (1), हडको (1), एसआरपीएफ कॉलनी (2), जटवाडा रोड (1), बीडबायपास (1), नारेगाव (3), जयभवानी नगर (2),ठाकरे नगर (1), न्यू एसटी कॉलनी, एन दोन सिडको (1), मनजीत नगर (1), एन नऊ सिडको (3), जुनी मुकुंदवाडी,विठ्ठल मंदिर जवळ (2), शंभू नगर, गारखेडा (1), न्यू विशाल नगर (5),ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (1), यशोधरा कॉलनी (1), गुलमंडी (1), पद्मपुरा (1), नागेश्वरवाडी (2), उस्मानपुरा (1), शिवशंकर कॉलनी (1), बेरी बाग (1), राजनगर (1), उत्तम नगर (1), जवाहर कॉलनी (1), ज्योती नगर (1), समर्थ नगर (10), सिडको (1) हनुमान नगर (1), सातारा परिसर (1), रमा नगर (2), विश्रांती नगर (3), सिडको वाळूज महानगर दोन (2), बजाज नगर, गुलमोहर कॉलनी (2), शिवाजी नगर (3), न्यू हनुमान नगर (1) गारखेडा (2), मयूर नगर (1), राहुल नगर (1), बजाज नगर (1), संभाजी कॉलनी (1), संजय नगर (1), आयोध्या नगर,सिडको (1), मोतीवाला नगर (1), संभाजीपेठ (1), अन्य (1) विश्वभारती कॉलनी (1) आणि रांजणगाव, शेणपूजी (1), चिकलठाणा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 39 स्त्री व 57 पुरूष आहेत.