महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – मराठवाडा विशेषप्रतिनिधी: संजीवकुमार गायकवाड- नांदेड: दि. 18 :- शेतकऱ्यांना शेतीवरील रासायनिक खते, कीटकनाशके, इत्यादी निविष्ठावरील खर्च कमी करणे, त्यावरील अवलंबित्व कमी करुन पर्यावरणपूरक जैविक निविष्ठा निंबोळी अर्क, निंबोळी पेंड, गांडूळ खत, तसेच सेंद्रिय खते, हिरवळीच्या खते वापरावीत असे आवाहन आमदार मोहन हंबर्डे यांनी केले.
नांदेड तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने विष्णुपुरी येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आमदार श्री. हंबर्डे बोलत होते.
या प्रशिक्षण सत्रात शेतकऱ्यांना बी बी एफ पद्धतीने सोयाबीन लागवडीचे महत्व सांगितले. शेतकऱ्यांनी गटांमार्फत औजर बँक तयार करावी. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सुखदेव रविकुमार यांनी केले.
शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी घेणे, फळबाग लागवड करणे, सामूहिक शेततळे घेऊन वॉटर बँक तयार करून पिकांची घनता वाढवून उत्पादनात भर घालावी असे तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले. मंडळ कृषि अधिकारी नांदेड यांनी पीक विमा योजना व शेतकरी अपघात योजनेविषयी शेतकऱ्यांना त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी हंबर्डे यांनी केले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक वसंत जारीकोटे, आत्माचे बीटी एम. शेखर कदम, कृषी सहायक श्रीमती शिंदे सोनाली, गवळी प्रीती, नंदू हंबर्डे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार शामराव हंबर्डे, विठ्ठल हंबर्डे, रामचंद्र हंबर्डे, अमृतराव हंबर्डे, अंबादास हंबर्डे आदींसह विष्णुपुरी येथील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शेवटी आभार विष्णुपुरीचे कृषी सहायक शिंदे सोनाली यांनी केले आहे.