राज्यातील रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; प्रवाशांना काय काय सुविधा मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । भारतीय रेल्वेत मोठ्या सुधारणा होत आहे. नवीन नवीन रेल्वे सुरु केल्या जात आहे. वंदे भारतसारखी सेमी हायस्पीड ट्रेन सुरु झाली आहे. बुलेट ट्रेन सुरु करण्याचे काम सुरु आहे. लोकलमध्ये बदल केला जात आहे. जुन्या लोकलची जागा वंदे लोकल घेणार आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांचाही विकास केला जात आहे. रेल्वे स्थानकांवर विविध सुविधा निर्माण केल्या जात आहे. आता राज्यातील पुणे, मुंबईसह विविध रेल्वे स्थानकावर नवीन योजना सुरु होणार आहे. त्यामुळे ही स्थानके बदलणार आहे.

कोणत्या स्थानकांचा समावेश
राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. त्यामध्ये पुणे, मुंबईसह राज्यातील इतर काही रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत पुण्यासह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा समावेश केला गेला आहे.

काय मिळणार सुविधा
रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच स्थानक परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. रेल्वे स्थानकांचा प्रवेशद्वार अधिक चांगला केला जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षागृहे अधिक चांगली केली जाणार आहे. यासाठी नवीन आराखडा तयार होणार आहे. स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मोफत वाय-फाय किऑस्कची उभारणी केली जाणार आहे.


रेल्वे स्थानकापासून रेल्वेपर्यंत बदल
रेल्वेने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. रेल्वे अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला जात आहे. ओडिशाच्या बालासोरजवळ तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकून रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातानंतर या पद्धतीचे कोणतेही अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे येत्या काही काळात रेल्वे स्थानकांपासून रेल्वेपर्यंत अनेक बदल दिसणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *