रेड झोन प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधणार ः सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा इशारा

Spread the love

विविध मागण्यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

पुणेः
पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दिघी, बोपखेल, भोसरी, कासारवाडी, रावेत, दापोडी, फुगेवाडी, तळवडे, निगडी, किवळे, पिंपरी, मोशी, चिखली येथील रेड झोन संरक्षित क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून पुणे जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यामातून शहरात जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना राबविण्यात आली होती त्यामधे प्रामुख्याने से २२ निगडी येथील ९ इमारती म्हणजेच ७२० सदनिका १३ वर्षापासुन धूळ खात पडून आहेत. तत्कालीन नगरसेविका सीमा सावळे यांच्या रेड झोन चे कारण देत केलेल्या तक्रारीने उच्च न्यायालयाने या ९ इमारती तसेच पुनर्वसन योजनेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करून हक्कच्या घरापासून वंचित राहावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार वितरण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे निदर्शनाद्वारे आपण शहरातील रेड झोन क्षेत्राबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधणार आहोत, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला आहे.

म्हणूनच संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र २००० यार्ड वरुण ५०० मी इतका करावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी. जेणेकरून रेड झोन बाधित क्षेत्रातील नागरिकांना बँक लोन सेवा उपलब्ध होईल. तसेच बांधकाम परवाना मिळण्यास लाभ होईल फ़ळ. अश्या आशयाचे पत्र भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *